पोलीस पाटील पदासाठी एकूण 722 जागांची भरती
- पदाचे नाव: पोलीस पाटील
- एकूण जागा: 722
उपविभागानुसार जागा:
- जालना: 185
- अंबड: 183
- परतूर: 153
- भोकंदर: 201
शैक्षणिक पात्रता:
उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असावा.- तो स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे.
वयाची अट:
- 30 सप्टेंबर 2025 रोजी उमेदवाराचे वय 25 ते 45 वर्षांच्या दरम्यान असावे.
पोलीस पाटील पदासाठी एकूण 722 जागांची भरती :-
- अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
अर्ज शुल्क:
खुला प्रवर्ग: ₹800/-- मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक (A.D.G.): ₹600/-
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 30 सप्टेंबर 2025
- परीक्षेची तारीख:12 ऑक्टोबर 2025
पोलीस पाटील या पदाबद्दलची माहिती खालीलप्रमाणे आहे:
पोलीस पाटील म्हणजे कोण?
- पोलीस पाटील हे गावातील प्रशासकीय यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा आहे.
- महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम, १९६७ नुसार हे पद तयार करण्यात आले आहे.
- गावामध्ये शांतता, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटलाची नेमणूक केली जाते.
- पोलीस पाटलांची अनेक महत्त्वाची कर्तव्ये आहेत. त्यापैकी काही प्रमुख कामे:
गावामध्ये घडणाऱ्या किंवा घडण्याची शक्यता असलेल्या गुन्ह्यांची माहिती तात्काळ पोलीस आणि कार्यकारी दंडाधिकारी यांना देणे.
www.nmkmaha.in
गावातील सार्वजनिक शांतता बिघडू नये यासाठी प्रयत्न करणे.
पोलीस अधिकाऱ्यांना मदत:
पोलीस अधिकाऱ्यांनी तपासणी किंवा इतर कामांसाठी मदत मागितल्यास ती पुरवणे. आरोपीला पकडण्यासाठी गुप्त माहिती देणे.
ग्राम सुरक्षा:
गावातील मालमत्तेचे आणि सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करणे.
तंटामुक्त गाव मोहीम:
शासनाच्या तंटामुक्त गाव मोहीमेमध्ये सक्रिय सहभाग घेणे.
शासकीय आदेशांचे पालन:
कार्यकारी दंडाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेले आदेश आणि वॉरंट बजावणे.
महत्त्वाच्या घटनांची नोंद:
गावात जन्म-मृत्यू, साथीचे रोग, किंवा इतर महत्त्वपूर्ण घटनांची नोंद ठेवून त्याची माहिती वरिष्ठांना देणे.